सुवर्णसंधी ! MIDC मध्ये 802 पदांची भरती, असा करा अर्ज

0

लोकशाही नोकरी संदर्भ 

सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर ही बातमी नक्की वाचा.  महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) भरती निघाली आहे.

एमआयडीसीत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी नोकर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एमआयडीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनूसार तिन्ही वर्गवारीत एकूण 802 पदांसाठी निवड प्रक्रीया राबविली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्रुपी ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी जाहीरात दिली आहे.

 

अधिकृत वेबसाईट –  https://www.midcindia.org/recruitment/

अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख – 02/09/2023

अर्ज भरण्याचा अंतिम तारीख – 25/09/2023

अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख – 10/10/2023

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 02 ते 25 सप्टेंबर 2023

अर्ज शुल्क – १ हजार रुपये

मागासवर्गीयासाठी अर्जाचे शुल्क – 900 रुपये

 

अर्ज सादर करण्यापूर्वी एमआयडीसीद्वारा विविध पदांच्या भरतीसाठी ठेवलेल्या शैक्षणिक अटी आणि नियम पूर्ण केलेले हवेत. उमेदवार भरतीसाठी दिलेल्या परिपत्रकाचे वाचन करुन शैक्षणिक अर्हता आणि इतर नियम पाहू शकता. उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.