‘या’ दिवसापासून मुंबई दर्शन होणार बंद, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई शहर गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचं क्रेंद्र आहे. मुंबई शहरात लाखो पर्यटक येतात. त्यातच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून म्हणजेच हद्दपार होणार आहे. परिणामी ओपन डेक बसमधून होणारे ‘मुंबई दर्शन’ ५ ऑक्टोबर बंद होणार आहे. त्यानंतर ओपन डेक बस चालवण्याचा सध्यातरी कुठलाही विचार बेस्ट उपक्रमाचा नसल्याचा सांगण्यात आलं आहे. बेस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा धक्का बसला आहे.

५ ऑक्टोबर पासून मुंबई दर्शन बंद
सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचा आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. ५ नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली निविदा रद्द केल्याने बेस्टच्या माध्यमातून केले जाणारे ‘मुंबई दर्शन’ ऑक्टोबर पासून बंद होणार आहे.

तिनही बस टप्प्याटप्प्याने होणार बंद
मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी आणि मुंबईत आलेल्या पर्यटकांना शहरातील पर्यटन स्थळे बसमधून झटपट पाहता यावी यासाठी २६ जानेवारी १९९७ पासून एमटीडीसीच्या मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात अली होती. दर महिन्याला जवळपास २० हजार पर्यटक या बस सेवेचा लाभ घेत असल्याची आकडेवारी आहे. सध्या बेस्टकडे 3 डबल डेकर ओपन डेक बस आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.