“दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसाव लागणार नाही”; शरद पवार

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व्यथित होऊन शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसतेय. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आज याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला आहे. ‘दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावा लागणार नाही’, असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना फोन गेला आणि त्यांना तात्काळ मुंबईत बोलावण्यात आले. हा फोन गेल्यानंतर एकनाथ खडसे हे जळगाव नंतर मुंबईकडे लगेच रवानाही झालेत. दरम्यान उद्या राष्ट्रवादीच्या समितीची अध्यक्ष निवडीबाबत बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच अध्यक्ष निवडीच्या समितीत एकनाथ खडसे यांचा समावेश करा अशा सूचना शरद पवार यांनी समितीतील संबंधितांना दिल्याचे समोर येत आहे.

काय म्हणाले पवार
पवार म्हणाले की, ”आता हा जो निर्णय घेतला त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून जे लोक आले त्यांनी सांगू इच्छितो की, संध्याकाळी मी बैठक घेईल, त्यानंतर अंतिम निर्णय एक ते दोन दिवसात घेऊ. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.