प्रतिबंधित गुटका घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात, १० लाखाचा 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

मलकापूर (Malkapur) प्रतिबंधीत गुटखा चारचाकी वाहनाद्वारे घेऊन जात असतांना वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहनाचा बोदवड रोडवर अपघात घडला. या वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ४ लाख ८० हजार ४२८ रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा व वाहन अंदाजे किं.५ लाख ५० असा एकूण १० लाख ३० हजार ४२८ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आज ३ मे रोजी जप्त केल्याची कारवाई केली.

सागर आनंदा कपले रा. तरोडा ता.मुक्ताईनगर हा प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने झायलो वाहन क्र. एमएच १२ जीझेड ४१६५ मध्ये घेऊन जात असतांना बोदवड रोडवरील डॉ. चोपडे यांच्या शेताजवळी वाहनावरील ताबा सुटला व वाहन झाडाला धडकले असता, अपघाताची माहिती मिळतात मलकापूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, शहर पोलीस वाहतुकीचे महेश चोपडे, शरद मुंडे, पो.काॅ.वसीम, पो.काॅ.सोनोने, तसेच पोलीस कर्मचारी आनंद माने यांनी घटनास्थळी जाऊन सदर अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली.

त्यामध्ये वाहन चालक जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचाराकरिता डॉ.राहुल चोपडे यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले व वाहनातील प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला केसरी रंगाचे एकुण पुडे ७२६ नग प्रत्येक अंदाजे किं. १,४३,७४८ रु., विमल पान मसाला हिरव्या रंगाचे एकूण पुडे ९३६ नग किं १,७५,०३२ रू. विमल पान मसाला निळ्या रंगाचे एकुण पुढे २७० नग प्रत्येक किं १,२६,९०० रू., विमल तबाकू केसरी रंगाचे पुढे २४३ नग किं. ५३२४ रु., विमल तंबाकू हिरव्या रंगाचे पुडे ७२८ नग किं. २४,०२४/रु. तंबाकू निळ्या रंगाचे पुडे एकुण १८० नग किं ५,४०० रु. असा एकुण ४,८०, ४२८रु. चा विमल गुटका तसेच अपघातग्रस्त झायलो वाहन जुनी वापरती अंदाजे कि ५,५०,००० रु. असा एकूण १०,३०, ४२८ रु. चा मुद्देमाल दिसून आला. सदर वाहन चालक व मालक याचे विरुद्ध नं.२२३/२०२३ कलम २७९, ३३७,४२७, ३२८, २७२, २७३, १८८, भादवि सह कलम २० (२०००). २६ (२) (IN), २६ (२) (v), २७ (२) (e) ३० (२) (८) ३, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरेश रोकडे यांचे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.