जगात सर्वात महागडी पाण्याची बॉटल, ह्या बॉटलच्या किमतीत येईल ‘ऑडी’ कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पाण्याच्या बाटलीचे आपल्या आयुष्यात महत्व आहे. तस पहिले तर बदल्या काळानुसार बाटल्यांचे सुद्धा भरपूर प्रकार पाहायला मिळतात. बाजारात प्लास्टिकपासून ते स्टील, तांब्याच्या बॉटल उपलब्ध असतात. यांची किंमत क्वालिटीनुसार, फार फार तर 100 ते 200 रूपये असते. पण आता एका बॉटलची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहणार नाही. एवढाच नाही , तर ह्या बॉटलने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. जिची किंमत हजारो नाही तर लाखो रूपये आहे. जाणून घेऊया बॉटलमध्ये असं काय आहे की, याची किंमत लाखो रूपये आहे.

‘एक्‍वा डि क्रिस्टॅलो ट्रिब्‍यूटो ए मॉडिग्‍लीयानो’ असं ह्या बॉटलच नाव आहे. ही बॉटल गेल्या 13 वर्षापासून जगातली सगळ्यात महागडी आणि फॅशनेबल बॉटलच्या (Fashionable Bottle) रूपात ओळखली जाते. गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्ये या बॉटलची नोंद 2010 पासून केली गेली आहे.

काय आहे खास

बॉटलमध्ये भरलेल्या पाण्याबाबत सांगायचं तर यात केवळ 750 एमएल पाणी भरलेलं असतं. ज्याची किंमत 50 लाख रूपये आहे. या बाटलीचं महाग असण्यामागचे कारण म्हणजे बॉटलची खास पॅकेजिंग आणि डिझाइनमुळे आहे. मुळात ही बॉटल 24 कॅरेट शुद्ध सोन्याने तयार केली आहे. यात भरलेल्या पाण्यात 5 ग्राम 24कॅरेट गोल्ड मिक्स केलं आहे. इतकंच नाही तर यात भरलेलं पाणी पृथ्वीवरील सगळ्यात शुद्ध पाणी आहे. हे पाणी आइसलॅंड, फिजी आणि फ्रान्सच्या ग्लेशिअरमधून आणण्यात आलं आहे.

जगात फक्त एकमेव बॉटल
ट्रिब्‍यूटो मोडिग्लियानी जगातील एकच बॉटल आहे. ही गोल्डशिवाय प्लॅटिनम (Platinum) आणि हाय क्वालिटी डायमंडने तयार करण्यात आली आहे. ही बॉटल तयार करणारी कंपनी अल्‍टमिरानोने सामाजिक कार्यासाठी 5 लाख यूरो दान केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.