मोठी बातमी; राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीतील फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थन आमदारांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्यासोबतच अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, हे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. दरम्यान या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.