बीसीसीआयने ‘या’ २८ वर्षांच्या युवा खेळाडूवर सोपवली कर्णधार पदाची जबाबदारी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने (BCCI) चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्स (Asian Games) स्पेर्धेसाठी मेन्स आणि वूमन्स टीम इंडियाची घोषणा केली. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) हा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली. बीसीसीआयने टीम इंडियाच्या २८ वर्षांच्या युवा खेळाडूला मोठी जबाबदारी दिली आहे.

बीसीसीआयने टीम इंडियातून गेले अनेक महिने बाहेर असलेल्या खेळाडूला कॅप्टन केलंय. हा खेळाडू टीम इंडियातून फेब्रुवारी २०२२ पासून बाहेर आहे. वेंकटेश अय्यरवर याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. वेंकटेश अय्यर याला देवधर ट्रॉफीसाठी सेंट्रल झोन टीमची कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.