‘या’ २० राज्यांमध्ये हवामान खात्याने जरी केला अलर्ट, वाचा सविस्तर

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता देशातील सुमारे २० राज्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशापासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील ५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसामध्येच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासाठीही अलर्ट जरी करून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

दिल्लीमध्ये यमुना नदीला आलेल्या पुरानंतर आता दिल्लीमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात १६ ते १९ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चार दिवसामध्ये कमल तापमान हे ३१ ते ३२ डिग्री आणि किमान तापमान हे २६ ते २७ डिग्री एवढे राहू शकते. तर २० जुलैपासून पासून पावसाचं प्रमाण कमी होईल. दिल्लीमध्ये १५ जुलैमध्ये ३०८ मिमी पाऊस पडला आहे. तो सरासरी पावसाचे १०५ मिमी अधिक आहे. असा परिथितीत पावसाच्या अलर्टने दिल्लीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशमधील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या तीन दिवसांमधून जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील, विविध भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान, ४५ ते ५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.