आता शाहरुखच्या महागड्या घड्याळीची चर्चा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
‘पठाण’ चित्रपटामुळे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्लेया आसताना आता त्याने हातात घातलेल्या घड्याळीची चर्चा होत असून हे घड्याळ किती रुपयांचे आहे इथपासून ते वेळ दाखवत असल्याने त्यात नवीन काय ? असा प्रश्न नेटकऱ्यानी आहे.

शाहरुख खान नुकताच इंटरनॅशनल लीग टी-20च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाला होता. त्या वेळी त्याच्या हातात असलेललं घड्याळ चर्चेचा विषय ठरलं. या समारंभावेळी शाहरुखच्या लूकऐवजी त्याच्या घड्याळाची जोरदार चर्चा झाली. हे घड्याळ जितकं सुंदर आहे, तितकचं महागडंदेखील आहे.

दुसरीकडे काही युझर्सनी शाहरुखच्या या महागड्या आणि सुंदर घड्याळाची प्रशंसा केली आहे. शाहरुखचं हे घड्याळ ऑडेमार्स पीगेट ब्रँडचं आहे. या ब्रँडच्या मॉडेलचं नाव रॉयल ओक पर्च्युअल कॅलेंडर असं आहे. या घड्याळाचं बाजारमूल्य सुमारे 4 कोटी 74 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुखचं हे चार कोटींचं घड्याळ सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.