माया संस्कृतीमधील २ हजार वर्षांपूर्वीचे शहर सापडले !

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

ग्वाटेमालातील एका रेन फॉरेस्टमध्ये संशोधकांना तब्बल दोन हजार वर्षे जुने शहर सापडले आहे हे शहर माया संस्कृतीतील असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे ग्वाटेमाला आणि मेक्सिको यांच्या सीमेवर पसरलेल्या 650 चौरस मैल रेन फॉरेस्टमध्ये उत्खननादरम्यान या माया संस्कृतीतील शहराचा शोध लागला हे शहर सुमारे 2000 वर्षांपूर्वीचे असून या शहरामध्ये तेव्हा 1000 वसाहती असायच्या असा संशोधकांचा अंदाज आहे.

अमेरिका फ्रान्स गॉटेमाला या देशातील संशोधकांनी लाईट डिटेंशन अँड रेंजिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून या शहराचा शोध लावला एनशियंट मेसोमोरीका नावाच्या एका आघाडीच्या नियतकालिकात या संशोधनाचा लेख प्रसिद्ध झाला आहे या शहरांमध्ये काही ठिकाणी पिरॅमिड सदृश बांधकामेही आढळली काही ठिकाणी रिकामे मैदाने आहेत ज्या ठिकाणी कदाचित क्रीडा स्पर्धा भरवल्या जात असाव्यात आगामी कालावधीमध्ये या शहराचे आणखी संशोधन केल्यानंतर नवे निष्कर्ष जाहीर केले जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.