सावदा फैजपूर महामार्गावर बस – ट्रकची समोरासमोर धडक…

0

 

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सावदा फैजपूर महामार्गावर आज संध्याकाळी 7 वा 30 मिनिटांनी सावदा येथील साईबाबा मंदिराजवळ खाजगी बस आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. खाजगी बसमध्ये 18 प्रवासी असल्याचे समजते यापैकी खाजगी बसच्या चालकाला फैजपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवाशांपैकी अजंदा तालुका रावेर येथील तेरा वर्षीय बालक किरकोळ जखमी असल्याचे कळते. दरम्यान वृत्त कळताच सावदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. यावेळी सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, देवेंद्र पाटील, यशवंत टाकळे, पोलीस कॉन्स्टेबल कुरकुरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, गृह रक्षक दलाचे जवान यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान जेसीबीच्या सहायाने अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.