हलखेडा येथील तरुणाचा श्रींचे विसर्जन करताना बुडून मृत्यू

0

कुन्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर – : गणेश भक्तांकडून गुरुवारी श्री गणरायाला भक्तीभावाने निरोप देत असतानाच हलखेडा येथील युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे पवार कुटुंब व ग्रामस्थांवर मृत युवकाला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

हलखेडा येथील फिरीजखान गव्हाणसिंग पवार (वय २५) हा युवक गुरुवारी सांयकाळी आपल्या घरातील श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सिन फाटा येथील पाझर तलावावर गेला

होता. मात्र, या वेळी त्याचा पाण्य तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. या वेळी उपस्थितांनी ही माहिती पोलीस पाटील अनेश बनेशबाबू पवार यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा पोहणाऱ्यांकडून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्र झाल्याने सकाळी फिरोज याला शोधण्याचे काम चांगदेव येथील नावाडी संघटनेच्या पोहणाऱ्यांकडुन पुन्हा हाती घेण्यात आले. दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिरोज याचा मृतदेह आढळला. याबाबत पोलीस पाटील अनेश पवार यांच्या माहितीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मृत फिरोज याच्या पश्चात पत्नी व तिन मुले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. ग्रामस्थांवर श्री गणराया सोबतच त्याला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.