प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाच्या घरात चोरटयांनी केला हात साफ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

येथील श्री साईगजानन महाराज मंदिरासमोरील रामचंद्र नगरमधील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक विकास रामदास पिंगळे हे शुक्रवारी (ता.५) आई, वडील, भाऊ यांच्यासह पुणे येथे लहान भावाकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. सोमवारी (ता.८) विकास पिंगळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील पंडित याना मोबाईलवरून पाण्याची नळी मंदिरात ओढून घ्या, असे सांगितले. त्यावेळी पंडित महाजन यांनी तुमच्या घराचा मागील दरवाजा शनिवारपासून (ता.६) उघड असल्याचे सांगितले. घरी चोरी झाल्याचे समजताच पिंगळे कुटुंबातील सदस्य एरंडोल येथे आले. त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच दोन कपाटे उघडून त्यातील सामान घरात सर्वत्र पसरलेला दिसला. त्यांनी घरात असलेल्या सोन्याचे दागिने पहिले असता, दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅम वजनाची देवाची मूर्ती यासह विविध सोन्याचे व चांदीचे दागिने असा सुमारे ९७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.