महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील दळवेल तांडा येथे महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी संभाजी भिल चव्हाण याला येथील न्यायालयाने सोमवारी (दि. ८) एक वर्ष सध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपी संभाजी भिला चव्हाण (रा. दळवेल तांडा, ता. पारोळा) याने १८ जानेवारी २०१७ ला फिर्यादी महिलेच्या घरासमोर तिला धक्का देऊन तिला जमिनीवर फरफटत नेले व लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केला.

या गुन्ह्यात भादंवि कलाम ३५४ अन्वये गुन्हा केल्याचा आरोप संभाजी भिला चव्हाण याच्यावर करण्यात आला होता. आरोपी संभाजी भिला चव्हाण (रा. दळवेल तांडा, ता. पारोळा) याला एक वर्ष कारावासाची शिक्षा १ हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास आणखी एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियाेक्ता पी. बी. मगर यांनी युक्तिवाद केला तर या गुन्ह्याचा तपास पारोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी बाळकृष्ण शिंदे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.