राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याच्या धमक्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना धमक्या मिळत असून त्यांनी पोलीस आयुक्तांकडे संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.

हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत तर काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे.

राजकुमार संतोषी यांनी मुंबईतील विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहून कुटुंबासाठी आणि स्वत:साठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.