संजय राऊतांवर गंभीर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

0

उमरखेड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्याने आणि लिखाणाने चर्चेत असतात. कधी पत्रकार परिषद घेऊन किंवा सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातील अग्रलेख किंवा रोखठोक सदरातून संजय राऊत हे मोदी सरकार, भाजपवर निशाणा साधत असतात. मात्र आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अक्षेपार्ह लिखाण केल्याने संजय राऊतांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://x.com/ANI/status/1734462813022847202?s=20

मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतड यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ‘सामना’ या वृत्तपत्रातून देशविरोधी वक्‍तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केला होता. या तक्रारीवरून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.