रिजुल मैनी हिने पटकावला मिस इंडिया यूएसए 2023 चा पुरस्कार

0

वॉशिंग्टन डीसी: मिशिगनमधील वैद्यकीय विद्यार्थिनी रिजुल मैनी हिला न्यू जर्सी येथे आयोजित वार्षिक स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2023 चा पुरस्कार मिळाला आहे.या कार्यक्रमादरम्यान मॅसॅच्युसेट्स येथील स्नेहा नांबियार हिला मिसेस इंडिया यूएसए म्हणून घोषित करण्यात आले आणि पेनसिल्व्हेनिया येथील सलोनी राममोहन हिने मिस टीन इंडिया यूएसएचा किताब पटकावला.

भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणाऱ्या या तमाम स्पर्धेचा यंदा ४१ वा वर्धापन दिन आहे. याची सुरुवात न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी वर्ल्डवाईड पेजंट्सच्या बॅनरखाली केली होती.
24 वर्षीय भारतीय-अमेरिकन मैनी ही वैद्यकीय विद्यार्थिनी आणि मॉडेल आहे. तिला सर्जन बनण्याची आकांक्षा आहे आणि सर्वत्र महिलांसाठी एक आदर्श म्हणून काम करण्याची तिची आशा आहे, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

व्हर्जिनियाची ग्रीष्मा भट फर्स्ट रनर अप तर नॉर्थ कॅरोलिनाची इशिता पाई रायकर ही सेकंड रनर अप ठरली. आयोजकांच्या मते, मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 25 हून अधिक राज्यांतील 57 स्पर्धकांनी भाग घेतला.तिन्ही श्रेणीतील विजेत्यांना त्याच गटाद्वारे आयोजित मिस-मिसेस-टीन इंडिया वर्ल्डवाइड स्पर्धेत भाग घेण्यासाठी मोफत विमान तिकिटे मिळतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.