धक्कादायक ! चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण (व्हिडीओ)

0

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सांगली येथे पालघर घटनेची पुनरावृत्ती झालीय. चोर समजून चार साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

व्हिडीओ व्हायरल

सांगलीच्या जत  तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश येथील चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांना चारही साधूंना मारहाण केली.

पोलिसांकडून तातडीनं कारवाई

उमदी पोलिसांकडून तातडीनं कारवाई करून नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवलं गेलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलागत असणाऱ्या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना गाडीतून ओढून पट्ट्यानं, काठीनं मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.