सलमान करिष्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार…?

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कपूर कुटुंबाचा जावई होणार प्रसिद्ध अभिनेता सलमान खान. लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता सलमान खान कपूर कुटुंबातील मुलीला आपली वधू बनवणार असल्याचं बोललं जात आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अभिनेता सलमान खानची ही गोष्ट खरी आहे की नाही, हे अद्याप समजलेलं नाही.

अभिनेता सलमान खान लवकरच कपूर कुटुंबातील मुलगी करिश्मा कपूरसोबत लग्न करणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. अभिनेता सलमान खान लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सलमान खान अभिनेत्री करीना कपूरची मोठी बहीण करिश्मा कपूरसोबत लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची बातमी समजताच लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खान खरंच लग्न करणार आहे का? अशी चर्चादेखील सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. पण समोर आलेली ही बातमी खरी आहे की फक्त अफवा आहे या बद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काही दिवसांपासून सलमान खानचं नाव या अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. आधी अभिनेता सलमान खानचं नाव सोनाक्षी सिन्हासोबत जोडलं गेलं होतं, त्यानंतर आता त्याचं नाव करिश्मा कपूरसोबत जोडलं जात आहे. सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. त्यानंतर सलमान खानचे हे फोटो पाहून तो लवकरच लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघांचे एकत्र फोटो पाहून दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

अभिनेता सलमान खान अजूनही बॅचलर आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री करिश्मा कपूरनेही पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला आहे.  तर करिश्मा कपूर आणि सलमान खान दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात. अलीकडेच अभिनेत्री करिश्मा कपूरने सलमान खानसोबतच्या ईद पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. तेव्हापासून या दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. मात्र या दोघांचं नात मैत्रीचं असून त्यांच्या लग्नाच्या बातम्या फक्त अफवा असल्याचं कळतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.