साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र गाजरी गवताच्या विळख्यात

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

येथून जवळच असलेल्या साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांचा विळख्यात अडकले असून या आरोग्य केंद्राला वाली कोण असा प्रश्न येथील ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २२ गावे जोडण्यात आली आहे तर आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या तुटवडा असल्यामुळे  आजारी रुग्णांना ईमजर्न्सी काही घटना घडल्यास तालुक्यातील ठिकाणी रवाना करावे लागत असल्यामुळे मोठा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. कर्मचारी कमी सुविधाचा अभाव असल्यामुळे येथे विविध समस्यांचा अभावामुळे येथील कर्मचारी व रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे.

दवाखान्याला व परिसरातील कर्मचाऱ्यांच्या रहिवाशी खोल्याच्या आजूबाजूला गाजरी गवत मोठ्या प्रमाणात झाले असून डुकरांचा उपद्रव वाढला आहे. दवाखान्यात विजेचे आठ विद्युत पोल असून दोन पोलवर बल्ब लावण्यात आले आहे तर सहा पोलवरील लाईट बंद असल्यामुळे अंधाराचे सामराज्य आहे. दवाखान्यातील कंम्पाउंडला  ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भगदाळ पडले असल्यामुळे कुत्रे, डुकरे गावातील मोकाट गुरु वावरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे सामराज्य पसरले आहे. येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी विविध समस्यांनी त्रस्त असून समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.