हिवरखेडे येथे महिलेला मारहाण शिवीगाळ करून विनयभंग

0

पारोळा ;- तालुक्यातील हिवरखेडे येथे एका 45 वर्षे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,वरखेडा येथील रहिवासी आरोपी बीराम भगवान पवार वय 50 याने ११ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या घरासमोर सार्वजनिक जागी पीडीतेला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला आरोपी बीराम पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.