साकळी येथील बस थांंब्याची दयनीय अवस्था

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथील बसस्टँडची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे. तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बसस्टँडमध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला प्रवाशांना कुठे बसावे ?असा प्रश्न पडत असतो.

सदर बसस्टँड लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी साकळीसह परिसरातील प्रवासी नागरिक करीत आहे. साकळी हे गाव मोठे आहे. साकळी गावाला परिसरातील जवळपास सात ते आठ खेडे सुद्धा लागून आहे. साकळीसह परिसरातील नागरिकांना दुरच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी साकळी बसस्टँडवर यावे लागते. या ठिकाणी थांबून बसची वाट पाहवी लागते. मात्र या प्रवाशांना बसण्यासाठी या ठिकाणी फार जुन्या बांधकामाचे बसस्टँड आहे.

मात्र आता या बसस्टँड मधील बसण्याच्या जागेवरील सर्व फरशा निघालेल्या असून या ठिकाणी बसायला शोधूनही जागा सापडत नाही. तसेच आजूबाजूच्या भिंतींची सुद्धा पडझड झालेली असून छप्पर सुद्धा तुटलेले आहे.

पावसात तर याठिकाणी पाणीच पाणी झालेले असते. तर उन्हाळ्यात ऊन सहन करावे लागते. एकूणच या बस स्टँडच्या गंभीर व धोकेदायक अशा दुरवस्थेमुळे बस स्टँडच्या परिसरात उभे राहणाऱ्या प्रवासी नागरिकांच्या जीवासही धोका संभवू शकतो. त्याचप्रमाणे बसची तासंतास वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना फार मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तरी सदर बसस्टँडच्या गैरसोयीकडे संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर बसस्टँडची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी व सुसज्ज असे बसस्टँड प्रवाशी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी साकळीसह परिसरातील प्रवासी नागरिक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.