शिंदी येथे वृद्धाची आत्महत्या; १५ जणांवर गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील शिंदी येथील नाना उखा मराठे (वय ५८) या वृद्धास जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १५ जणांवर भडगांव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील शिंदी येथील नाना उखा मराठे (वय ५८) या वृद्धास जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. मयत नाना उखा मराठे यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिंदी शिवारातील गट नं ३६३ मधील शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीला दोरी बांधुन गळफास घेतला होता.

याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे अकसमात मुत्युची नोंद दाखल करण्यात आली होती. चौकशी वरून यातील आरोपी यांनी जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ दमदाटी करीत असल्याने व जिवे मारण्याची धमकी देत असल्याने फिर्यादीचे वडील यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.

मयताचा मुलगा फिर्यादी भागवत नाना मराठे (वय ३६, रा. शिंदी. ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रमेश उखा मराठे, आशाबाई रमेश मराठे, रवींद्र रमेश मराठे, बारकु रमेश मराठे (रा.शिंदी ता.भडगाव), राजेंद्र त्र्यंबक चव्हाण, इंदुबाई राजेंद्र चव्हाण, तुषार राजेंद्र चव्हाण, ( रा.पथराड ता. भडगाव), रावण दोधा काळे, उषाबाई राजेंद्र काळे, चंद्रकात रावण काळे, योगेश रावण काळे (रा. शिरुड जि. धुळे), चिंतामन मोरे, बेबाबाई चिंतामन मोरे, भुरा चिंतामन मोरे, मनिषा भुरा मोरे (रा. पारोळा ता. पारोळा) अशा १५ जणांवर दि. ४ रोजी भडगाव पो.स्टे ला भादवी कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.