रोहिणी स्वीटमार्ट फोडून ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरेश दादा जैन कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये असलेले रोहिणी स्वीटमार्ट दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह २ मोबाईल असा ४८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपराम केसाराम चौधरी (वय ३६, रा. गणेश कॉलनी, साई मंदिराजवळ जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह  वास्तव्यास असून त्यांचे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स मध्ये रोहिणी स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे.

गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून २१ मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करत रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा एकूण ४८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी दुकान मालक अनुपराम केसाराम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसात दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.