खुशखबर ! आता ATM कार्डशिवाय काढता येणार पैसे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आता सर्वच जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत. म्हणजेच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणाली अर्थात UPI चा वापर वाढला आहे. मात्र ऑनलाईन व्यवहारासोबतच अनेक लोक एटीएमचा देखील वापर करत असतात. तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. आता तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तरी एटीएम मशीनमधून सहजतेने पैसे काढू शकता, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतामध्ये आता पहिले यूपीआय एटीएम सुरू करण्यात आले आहे. हिताची लिमिटेडच्या उपकंपनीकडून याची सुरुवात करण्यात आली आहे.

 

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पहिल्यांदाच यूपीआय एटीएम पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले. यूपीआय एटीएमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भाजप नेत्यांनीही यूपीआय एटीएमचे व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे आता लवकरच यूपीआय एटीएममुळे डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सुटका होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्याने हे पाऊल उचलण्यात आले असून UPI एटीएमला व्हाइट लेबल एटीएम मार्केटमध्ये आणण्यात आले आहे. त्यामुळे याच्या माध्यमातून एटीएम वापरकर्त्यांना वेगवेगळ्या खात्यावरून यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असे वापरा UPI ATM

मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएमचा कशा पद्धतीने वापरण्यात येईल, याबाबतचा एक डेमो व्हिडीओ सादर करण्यात आला. यामध्ये यूपीआय एटीएमला टच पॅनल असल्याचे दिसतेय. यूपीआय कार्डलेस कॅश या पर्यायावर क्लिक केल्यास आणखी एक विंडो सुरू होते. त्यामध्ये पैशांचे विविध पर्याय दिसता. जसे की, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये आणि अन्य. असे पर्याय दिसतात. त्यामुळे तुम्हाला जितके पैसे काढायचे त्यावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रिनवर क्यूआर कोड येईल. आता त्यानंतर यूपीआय अॅपवरून क्यूआर कोड स्कॅन करा. त्यानंतर युजर्सला बँक खाते निवडावे लागेल. बँक खाते निवडल्यानंतर UPI पिन टाकावा लागेल. ज्यानंतर तुम्ही निवडलेली रक्कम यूपीआय एटीएममधून बाहेर येईल. या संदर्भातील व्हिडीओ केंद्रीय मंत्री पियूष गोयल त्यांची X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.