गेंदालाल मिल परिसरात बंद घर फोडून मुद्देमाल लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील सुरेशदादा जैन नगर (Suresh Dada Jain Nagar) येथील गेंदालाल मिल (Gendalal Mill) परिसरात घरफोडी करून रोख रक्कम, साड्या आणि घरातील वस्तू असा एकुण ११ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल अभिमन भालेराव (वय ५७, रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव) हे  आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून २० हजार रुपयांची रोकड, सिलिंग फॅन आणि घरातील भांडे असा एकूण २२ हजार ८०० रुपये किमतीची मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

याप्रकरणी मंगल भालेराव यांनी शनिवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.