ट्रॅक्टर आदळले विद्युत खांबाला, मद्यधुंद ड्रायव्हर थोडक्यात वाचला..

0

मोरगाव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फार्मट्रेक कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसहित भागवत बाबा पाटील यांच्या घराजवळील विद्युत खांबावर जाऊन आदळले. त्यामुळे  मोठा आवाज होऊन विद्युत पुरवठा लगेच खंडित झाला. सुदैवाने त्यावर असलेला लहासे नामक ड्रायव्हर बालंबाल बचावला. जर विद्युत पुरवठा खंडित झाला नसता तर त्या ठिकाणी जीवितहानी नक्कीच झाली असती. अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.

इलेक्ट्रिक पोल शेजारी पाटील यांची बैल जोडी व गाडी सोडलेली होती. सुदैवाने या ठिकाणी बैल जोडीला सुद्धा कुठलाही धक्का लागलेला नाही. परंतु एवढ्या  सकाळी ट्रॅक्टरवरील चालकाने दारू पिलेली असल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. व गावात बोकाळलेले अवैध धंदे तसेच अवैध दारू विक्री यावर बंदी घालावी अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा चालू होती. एकंदरीतच या ठिकाणी एवढ्या मोठा अपघात होऊन सुद्धा साधे कुणाला खरचटले सुद्धा नाही त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.