भडगाव येथे अखिल भारतीय समता परिषदेचा मेळावा संपन्न 

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील आदर्श कन्या विद्यालयात उत्तर महाराष्ट्र समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 रोजी संपन्न झाला.

या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करतांना त्यांनी सांगितले की सद्य स्थितीत महाराष्टातील मराठा समाज ओ. बी.सी. समाजातील आरक्षणात मागणी करीत आहे. त्यामुळे ओ. बी.सी समाजाला मिळणारे 27% आरक्षणात साधारणपणे 400 जात समुह आहे. आणि त्यात मराठा समाजाला समाविष्ठ केल्यास कुणालाही काही मिळणार नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी ना. छगनरावजी भुजबळ यांच्यासह अनेक ओ.बी.सी नेत्यांनी केली आहे तसेच ओ.बी.सी बांधवांनी सज्ज राहून आपले आरक्षण कसे अबाधित व कायम राहील तसेच ओ.बी.सी आरक्षणास सरकारने इतर समाजास समाविष्ट केले जाणार नाही. असे सांगितले तस ओ.बी.सी समाजास पुढील काळात आंदोलन करण्यासाठी तयार रहावे असे आव्हान यावेळी केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समता परिषदेचे संपर्क प्रमुख अनिल नाळे, जिल्हा अध्यक्ष सतीश महाजन, माजी जि.प . सभापती एकनाथ महाजन, कजगाव सरपंच रघुनाथ महाजन, जेष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, विजय महाजन, सुनील महाजन, प्रदीप महाजन समता परिषदेचे जिल्हा कार्यकारणीचे जेष्ठ सदस्य भगवान महाजन गुढे, दिनेश पाटील, श्याम पाटिल सर, विनोद महाजन, रमेश महाजन, रवी महाजन, रवींद्र महाजन भडगाव, सुरेश रोकडे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, भडगाव शहरध्यक्ष भिकन महाजन,पाचोरा तालुका अध्यक्ष सुदर्शन महाजन, शहर अध्यक्ष भास्कर महाजन, चाळीसगाव तालुका अध्यक्ष कैलास जाधव, भगवान रोकडे, युवक अध्यक्ष प्रशांत महाजन जिल्हा कार्याध्यक्ष सुरेंद्र महाजन बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस. पी रोकडे तर आभार भानुदास महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.