खाद्यसंस्कृती: स्पाँजी रवा ढोकळा

0

लोकशाही विशेष लेख 

 

आपल्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सतत काही ना काही नवीन रेसिपी बनवण्याच्या प्रयत्नात असतो.  खवय्ये म्हटलं तर ते साहजिकच आहे. आपण आतापर्यंत खूप चमचमीत पदार्थ केले आजचा मेन्यू सुद्धा खमंग आहे. खमंग म्हणण्याच कारण म्हणजे आज आपण चहाच्या वेळात खाऊसाठी हलकाफुलका रवा ढोकळा बनवणार आहोत. बेसण ढोकळा आपण नेहमीच खात असतो, बाजारातून आणून किंवा घरीच बनवला जातो. पण रवा ढोकळा कसा परफेक्ट बणवायचा यासाठी आज आपण पाहणार आहोत. झटपट ‘स्पाँजी रवा ढोकळा’ तयार करु.

 

‘स्पाँजी रवा ढोकळा’

 

साहित्य :

 

१ वाटी रवा, १ वाटी दही, १/२ (टि. स्पून) चमचा खायचा सोडा,  १/२ पॅकेट इनो, १ चमचा साखर, १/२ चमचा खायचे तेल, चवीनुसार मीठ

 

कृती :

१) प्रथम  दही फेटून त्यात रवा घालून १/२ तास  भिजत ठेवून द्यावे.

२) रवा चांगला भीजवून त्यामध्ये मीठ आणि खायचा सोडा घालून चांगले फेटून १० मिनिटे ठेवून द्यावे.

३) त्या मिश्रणात साखर व तेल घालून एकजीव करून घ्यावे.

४) आता या लास्ट स्टेपला ईनो घालून पटकन मिश्रण फेटून ते लगेचच तेल लावून घेतलेल्या ईडली पात्रामध्ये भरून १५/२० मिनिटे वाफवण्यासाठी ठेवून द्यावे.

५) तयार ढोकळा थंड झाल्यावर त्याचे पीसेस करून त्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा चाट मसाला घालावा.

६) वरतून फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता व १/२ वाटी पाणी घालून थोडी साखर घालून ते मिश्रण तयार ढोकळ्यावर ओतून ५ मिनिटे ठेवून नंतर सर्व्ह करा.

 

टिप : स्पाँजी ढोकळा तयार करण्यासाठी साहित्य अचूक घेणे आवश्यक आहे.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे.

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

 

Leave A Reply

Your email address will not be published.