रश्मिका मंदाना – विजय देवरकोंडा अडकणार लग्नबंधनात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांची जोडी प्रचंड हिट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाला डेट करत आहे. अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनबद्दल अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. ट्वीटरवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, तू आमची नॅशनल क्रश आहे. तुझ्यासारखी पत्नी मला मिळेल, अशी आशा आहे”. या ट्वीटवर प्रतिक्रिया देत रश्मिकाने लिहिलं आहे,”ओह… मी जेव्हा लग्नाचा विचार करेल तेव्हा माझा पतीदेखील असाच विचार करणारा असावा”.

‘गीता गोविंदम’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विजय आणि रश्मिकाची पहिली भेट झाली होती. प्रत्येक सण दोघे एकत्र साजरा करतात. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रश्मिका आणि विजयचा साखरपुडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.