बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरलं, ५ पोलीस हल्ल्यात ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे आज (सोमवारी) झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटात पाच पोलीस ठार झाले आहे. या स्फोटात २० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलीस संरक्षण दलाला लक्ष करून हा हल्ला करण्यात आला. बाजौर जिल्ह्यात पोलिओविरोधी मोहिमेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकाला ट्रकमधून नेले जात असताना हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, आयईडी स्फोटात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. जखमी नागरिकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

रविवारी झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू
रविवारी झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू पख्तुनख्वा येथे दहशतवादी हल्ल्यात ४ जण ठार झाले होते. अज्ञात बंदूकधार्यंनी दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. पाराचीनरहून पेशावरला जातांना हा हल्ला झाला. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा परिसर शिया आणि सुन्नी यांच्यातील सांप्रदायिक हिंसाचारासाठी देखील ओळखला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये ४१९ दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये ६२० लोक मारले गेले. ठार झालेल्यांमध्ये ३०६ कर्मचारी, २२२ नागरिक आणि ९२ दहशतवादी यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.