ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचे मोबाईल ,रोकड ,डिझेल बॅटरी चोरटयांनी लांबविली

0

जळगाव ;- शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर असलेल्या एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत ट्रक लावून झोपलेल्या चालकाचे मोबाईल,१० हजारांची रोकड,डिझेल आणि बॅटरी अज्ञात चोरटयांनी लांबविल्याचा प्रकार ७ रोजी पहाटे अडीच ते सकाळी ७ वाजे दरम्यान घडला . याप्रकरणी चालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सागर गोरक्ष ढवन वय २९रा,. उल्हास नगर हे ट्रक चालक असून त्यांनी ७ रोजी गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज समोर असणाऱ्या एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत विश्रांतीसाठी आयशरट्रक क्रमांक एम एच ०५ एफ जे ३४१९ लावून क्लिनर गुलाम गौस याच्यासोबत झोपलेले असताना अज्ञात चोरटयांनी प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, १० हजार रुपयांची रोकड, ४ रुपये किमतीची बॅटरी , ८ हजार ५०० रुपयांचे ९० लिटर डिझेल ,२ हजारांचे स्पीकर असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार ७ रोजीच्या पहाटे अडीच ते सकाळी ७ वाजेदरम्यान घडला . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून तपस सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.