उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी ; या रसदार फळांचे सेवन ठरेल फायदेशीर

0

मुंबई ;- उन्हाळा आला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कडक उन्हातून फिरणे टाळावे, मात्र बाहेर जायचेच असेल तर संपूर्ण शरीर झाकेल असे सैल, सुती कपडे, डोळ्यांना सनग्लासेस असावेत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे असते. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आहारही योग्य असणे गरजेचे आहे.

भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक, नारळपाणी, रस, लिंबू व इतर द्रवपदार्थांचे सेवन करा.

Leave A Reply

Your email address will not be published.