जळगावात २० वर्षीय तरुणीवर अत्याचार; संशयितास अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील २० वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्ती अत्याचार करून पैश्यांची मागणी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद पोलिसांनी संशयित तरूणाला अटक केले आहे.

सदर २० वर्षीय तरूणी ही यावल तालुक्यातील रहिवासी असून जळगाव येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तरुणी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहते. दरम्यान तिची ओळख विशाल राजेश तडवी याच्याशी झाली. दोघांच्या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

२८ ऑक्टोबर २०१८ पासून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वारंवार अत्याचार केला. तसेच त्यानंतर तरूणीकडून पैश्यांची मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करून मारहाण केली. याला त्रासाला कंटाळून तरूणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विशाल तडवी याच्या विरोधात तक्रार दिली.

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल राजेश तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.