जामनेर तालुक्यातील शेतमजूर विधवा महिलेवर बलात्कार

0

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या शेतमजूर विधवा महिला ही सरपण गोळा करीत असताना एकाने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घटना उघडकीस आले असून या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावातील संशयित आरोपी विष्णू पूनमचंद राठोड याने 7 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास 40 वर्षीय पीडित महिला ही सरपन गोळा करीत असताना तिला पकडून महिलेच्या जेठाच्या शेतात नाल्याजवळ घेऊन जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला . याप्रकरणी पीडित महिलेने पहुर पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपी विष्णू राठोड याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.