Monday, September 26, 2022

पाच वर्षीय चिमुकली अरिशाबानोने पकडले 30 दिवसाचे रोजे

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

येथील अंदरपुरा भागात राहणाऱ्या कु. अरिशाबानो इम्तियाज अहमद शेख या अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीने इस्लाम धर्मियांचा पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात तब्बल 30 दिवसाचा निर्जल्य पद्धतीचा उपवास ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

- Advertisement -

इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्याने सिद्ध केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. 3 एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात असून मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा ठेऊन अल्लाहप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात. अमळनेर येथील अरिशाबानो इम्तियाज अहमद शेख या अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीने ३० दिवसाचे रोजे ठेवून भविष्यात संस्कारक्षम आणि चारित्र्यसंपन्न व्यक्ती होण्याच्या मार्गात पहिले पाऊल ठेवले आहे. कडक उन्हाळ्यात सकाळी 4.35 ते संध्याकाळी 6.50 मिनिटांपर्यंतच्या तब्बल 30 दिवस निर्जल्य पद्धतीचा रोजा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकासह परिसरातील नागरिक देखील तिचे कौतुक करत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या