सुन्नी ईदगाहावर नमाज – ए – ईद -ऊल -फित्र अदा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुस्लिम बांधवांच्या पवित्र सण ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त आज सकाळी 8:15 वाजता सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, जळगाव या ठिकाणी नमाज – ए – ईद – ऊल – फित्र ( रमजान ईद ची नमाज ) मौलाना जाबीर रजा यांच्या नेतृत्वात अत्यंत भक्तिभावात अदा (पठण) करण्यात आली.

सर्वप्रथम सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक करून आपल्या मनोगतात समाज बांधवांना आवाहन केले की, आपण सर्वांनी अत्यंत आनंदात व उत्साहात व शांततेत कायद्याच्या चौकटीत राहून ईद साजरी करावी. अन्य कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. देश व समाज हितासाठी सर्वांनी आपापल्या परीने अथक परिश्रम घ्यावे असे म्हणून अहवाल सादर केला.

मौलाना नजमूल हक यांनी तरिका -ए – नमाज ( नमाज पठण करण्याची पद्धत) व दुवा (प्रार्थना) सांगितली. खुतबा व ( प्रवचन) मौलाना जाबीर रजा यांनी म्हटले. सला तो सलाम मौलाना अलीम रजा यांनी म्हटले. याप्रसंगी ” ए अल्लाह हम सबको अमान मे रख, आपसी भाईचारा, मोहब्बत बढा, मुल्क को और तमाम बाशिंदोको तरक्की अता फरमा, हम सब की बीमारीयो से हिफाजत फरमा, हमारे अझीम मुल्क भारत को महासत्ता बना, बेरोजगारो को जायझ रोजगार अता फरमा अशी दुवा प्रार्थना करण्यात आली.

शेवटी सै. अयाज अली नियाज अली यांनी ज.श. मनपा जळगाव व जिल्हा पोलिस दलाचे व महापौर जयश्री महाजन यांचे ईदगाहवर नमाज पठणासाठी मदत केल्यामुळे विशेष आभार मानले.

याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा, मौलाना नजमूल हक, मुफ्ती रेहान रझा अशरफी, मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना जुबेर आलम अशरफी, मुफ्ती गुलाम हसनैन, मौलाना अब्दुल हमीद, मौलाना अलिम रजा, मौलाना मतीन चिस्ती, इक्बाल वजीर, मुक्तार शहा, सय्यद जावेद, शाकीर चीतलवाला, रशिद कुरेशी यांसह 18000 मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.