चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने मृत्यू

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

१ वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने ती गंभीर भाजली गेली होती. १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना यावल येथे घडली आहे.

आरती कैलास भील (वय १, रा. मालोद ता. यावल) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. आरती भील ही चिमुकली आपल्या आईवडीलांसह राहते. आईवडील हे शेतात मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २१ एप्रिल रोजी सकाळी घरात चुलीवर अंघोळीसाठी पाणी तपाविण्यासाठी ठेवले होते. त्यावेळी चिमुकली खेळत असतांना अचानक चुलीवरील भांड्यातील उकळते पाणी खाली पडल्याने बाजूला असलेली आरती ही गंभीररित्या भाजली गेली.

दरम्यान तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. १२ दिवसांपासून चिमुकलीची मृत्यूशी असलेली झुंज संपली. सोमवारी २ मे रोजी रात्री ११.३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झीरो नंबरने यावल पोलीसात नोंद वर्ग करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.