राम करण यादव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

0

जळगाव ;- श्रीराम करण यादव यांनी मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून ०१ डिसेंबर पासुन पदभार स्वीकारला आहे.
ते १९८६ च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स (IRSE) चे वरिष्ठ अधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग (IRICEN), पुणे येथे महासंचालक म्हणून कार्यरत होते. ते श्री नरेश लालवानी यांच्यानंतर आले.

श्री यादव यांनी १९८५ मध्ये आयआयटी रुरकी येथून ऑनर्ससह बीई (सिव्हिल) केले आणि त्यांना उत्तर प्रदेश पी.डब्ल्यू.डी. परिवहन अभियांत्रिकीमध्ये प्रथम आल्याबद्दल शतक सुवर्ण पदक आणि विद्यापीठ रौप्य पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी १९८७ मध्ये आयआयटी दिल्लीतून एम.टेक (सॉइल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन इंजिनीअरिंग) केले आहे. मार्च १९८८ मध्ये ते रेल्वेमध्ये रुजू झाले. त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करण्याचा खूप समृद्ध आणि विपुल अनुभव आहे. पश्चिम रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे, IRICEN पुणे, RITES आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर त्यांनी विविध पदांवर तसेच मुख्यालयांमध्ये काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.