महापरिनिर्वाण दिन : रेल्वे अनारक्षित विशेष गाडी चालवणार

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन  रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. १ विशेष गाडी अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चालविण्यात येईल.

अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष 

विशेष गाडी क्रमांक.01218 दि. 5.12.2023 रोजी अमरावती येथून 17:45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 05:25 वाजता  पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक 01217 दि. 07.12.2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 00:40  वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 12:50  वाजता पोहोचेल.

थांबे: बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: १४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

सर्व संबंधितांना विनंती आहे की कृपया या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुखकर करावा. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.