खोकल्याचे औषध घेतल्याने ५ जण दगावले, तर २ जण गंभीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वातावरणात सातत्याने बदल होत असून, अनेकांना सर्दी खोकला, तसेच पाटाची लक्षणे दिसून येत आहे. त्यातच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अशातच खोकल्याचे विषारी औषध सेवन केल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यानंतर या लोकांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

सविस्तर माहिती अशी की, मृत व्यक्ती खेडा जिल्ह्यातील नाडियाड येथील बिलोदरा गावातील रहिवासी आहेत. खकल्याचा त्रास जाणवत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका दुकानातून खोकल्याचे सिरप घेतले होते. औषधाचे सेवन करताच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे या रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे उपचार सुरु असतांना दोन दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. अजूनही दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या कफ सिरपमध्ये मिथाईल अल्कोहोल असल्याचे नमुन्यांच्या तपासणीत आढळून आले.

या घटनेनंतर पोलिसांनी औषध विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आपल्याकडून ५० हुन अधिक लोकांनी औषधांनी खरेदी केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली काही लोक नाश करण्यासाठी कफ सिरपचा वापर करतात. त्याच्या अतिसेवनाने देखील मृत्यूचा धोका संभवतो. असं डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.