केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये प्रथमच आगमन झाले असून ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मतदार संघात आल्यानंतर त्याचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी रक्षाताई म्हणाल्या की, हे मंत्रीपद माझं नसून हे सर्व जनतेचे मंत्रिपद आहे. मी त्यांची प्रतिनिधी आहे. खूप आनंद झाला मला विश्वास वाटत नाही मी मंत्री झाले आहे. जबाबदारी वाढली आहे आव्हान खूप मोठी आहेत. 50 टक्के युवक देशात आहेत युवकांसाठी काम करेल .देशात चांगले खेळाडू घडत आहे पुढील काळत ऑलम्पिक स्पर्धा असून गाव खेड्यापर्यंत ऑलम्पिकचा प्रचार प्रसार करण्याचा काम करेल तसेच त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.

यावेळी डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, नंदू महाजन, जयपाल बोदडे, ललित महाजन, तुषार राणे,पंकज भारंबे, विनायक पाटील, गणेश कोळी, अंकूश चौधरी, सचिन पाटील, सतीश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. रक्षाताई खडसे यांचे मुक्ताईनगरला जंगी स्वागत !

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखील खडसे यांनी दणदणीत मताधिक्याने बाजी मारली होती. यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच विस्तारात त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी देखील मिळाली. यात त्यांना केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीस गेलेल्या रक्षाताई खडसे या आज पहाटे मुंबई येथून मुक्ताईनगरला आले. त्यांचे बोदवड चौफुली येथून जयघोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोलताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याची मिरवणूक काढण्यात आली. परिवर्तन चौकात महापुरुषांना वंदन केले. त्याच बरोबर सासरे एकनाथराव खडसे यांचा आशीर्वाद घेत पती निखिल खडसे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.