एक धागा शौर्याचा ! सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

“एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी” हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी एकत्रितपणे रक्षाबंधन हा सण देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सीमेवरील जवानांसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी जमा केलेल्या रक्कमेमधून जम्मू आणि काश्मिर , कारगिल,उत्तर प्रदेश व अरुणाचल प्रदेश येथील सीमेवरील जवानांसाठी राख्या स्पीड पोस्टद्वारे पाठवल्या.

भारतात साजरा होणाऱ्या विविध सण उत्सवात आपल्या सीमेवरील सैनिकांना सहभागी होता येत नाही. सैनिक निस्वार्थपणे आपल्या परिवाराची काळजी न करता देशहितासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून सदैव तत्पर असतात. म्हणून महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी रक्षाबंधन हा सण सैनिकांच्या या निस्वार्थ सेवेला सन्मान देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्यासोबत करण्याचे ठरवले आहे.

या उपक्रमात श्रद्धा गुरव, मयुरी पाटील, रोशनी राजपूत, सृष्टी देशमुख, दिव्यानी डहाके, निवेदिता काटोले, मंगला चौधरी, इंद्रायणी चव्हाण, विशाखा सूर्यवंशी, ऐश्वर्या तुम्मोड, उषा तुम्मोड, अश्विनी तुम्मोड, रोहिणी माने, नेत्रा रुपेश लोणकर, स्नेहल भोसले, सरस्वती कोळगे, राजाबाई सूर्यवंशी, प्रतिका वळवी, जानवी शहाणे, ऐश्वर्या राजपूत,  साक्षी गजभिये, मंजुळा औरादे, पुष्पांजली गायकवाड, गीतांजली गलांडे, मनीषा लवणकर, आरती कळसकर,गोरख नाझीरकर, अमीर सय्यद, यश कुमावत, नितीन चव्हाण, आकाश यादव, लक्ष्मण पवार, शिवराज पाटील, अनिल मोहिते, किरण गरड, निखिल कंकरे, श्रीकांत माने, सौरव बाविस्कर, प्रशांत नवले, राहुल गायकवाड, रोहित ठाकूर, आदेश शिंदे, संतोष लांडे, आकाश गवळी, दत्ता देवकते, आकाश वाघ, पंकज लामगे, बलराम राजले, वैभव पांडे, रोहन ठाकरे, संदेश वळवी, आकाश शहाणे, दुर्गप्रसाद, शहाणे, मयूर पाटील,जगन्नाथ सूर्यवंशी, अविनाश कोळगे आदींचा सहभागी होता.

Leave A Reply

Your email address will not be published.