संजय राऊतांचा ED कोठडीत मुक्काम वाढला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. ईडीने खरं तर १० ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने त्यांना ८ तारखेपर्यंत कोठडी सुनावली. त्यामुळे संजय राऊत यांना पुढचे चार दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.

प्रवीण राऊत यांच्याकडून जे पैसे मिळाले त्यातुन संजय राऊत यांनी अलिबाग येथील जमीन खरेदी केली असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. राऊत यांच्या परदेशी दौऱ्याची चौकशी आम्ही करतोय. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत याना अनोळखी व्यक्तीने १ कोटी १७ लाख रुपये पाठवले आहेत. असेच अजून मोठे व्यवहार झाले आहेत का याचा तपस आम्ही करत असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. यासाठी संजय राऊत यांची कोठडी १० ऑगस्ट पर्यंत द्यावी अशी मागणी त्यांनी कोर्टात केली.

संजय राऊत यांच्यावर नवीन आरोप नाहीत तर मग त्यांची पुन्हा चौकशी का ? असा सवाल मोहिते यांनी केला. राऊतांविरोधात फक्त राजकीय षडयंत्र आहे, त्यांना जबाब नोंदवण्यासाठी धमकावलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप करत ते पाटकर याना धमकी देत आहेत असं म्हंटल. यावर कोर्टाने उलट प्रश्न विचारत राऊत अटकेत असताना कशी धमकी देऊ शकतात असा सवाल पाटकर यांच्या वकिलांना केला, तसेच तुम्हाला जे काही पुरावे द्यायचे असतील ते ईडीला द्या असं कोर्टाने म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.