नारीशाक्तीने कर्तव्यावरील पोलीस बांधवाना बांधली राखी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

रक्षा बंधन हा भाव बहिणींसाठी सर्वात जिव्हाळ्याचा सण, मग भाऊ लहान असो, कि मोठा त्याला बहिण राखी बांधून त्याला आपल्या रक्षणाची एकप्रकारे जबाबदारी देते. त्याचा पद्धतीने पोलीस हे समाजाच रक्षण अहोरात्र करत असतात. त्यांना कुठलाही सणवार असो, आपलं कर्तव्य हे पार पाडाव लागतं.

त्यांच्या त्यागाच्या व कर्तव्याच्या भावनेला जाणून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व इनरव्हील क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. याप्रसंगी नारीशक्ती व इनरव्हील क्लबच्या महिलांनी कधी सुट्टी नसलेल्या व सतत सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या हाती राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पूर्ण केले. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, समाज कल्याणचे भरत चौधरी, मौलाना अल्पसंख्यांक फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख व इतर पोलीस बांधवांच्या हातावर संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील, इनरव्हील क्लब चे अध्यक्षा डॉ. रितू कोगटा, नूतन तासखेडेकर, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, योगिता बाविस्कर, भाग्यश्री महाजन, उल्का पाटे, अनिता पाटील, कविता पाटील, रंजन शहा, निकिता अग्रवाल, डॉ.शितल अग्रवाल यांनी राख्या बांधल्या. पवित्र प्रेमाचा रक्षाबंधन हा सण नारीशक्ती व इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. तर आभार नूतन तासखेडकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.