ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; राज्यवर्धन सिंग राठोड (नेमबाजी)

0

लोकशाही विशेष लेख

राज्यवर्धन सिंग राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांचा जन्म २९ जानेवारी १९७० रोजी राजस्थान मधील जैसलमेर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जैसलमेर येथेच झाले. त्यांचे वडील लष्करी अधिकारी आणि आई शिक्षिका असल्याने त्यांच्या घरात एकूणच अत्यंत शिस्तीचे वातावरण होते. या शिस्तीमुळेच त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शिक्षण हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे आणि त्यानंतर भारतीय सेना प्रबोधिनी, डेहराडून येथे झाले. बालपणात त्यांना इतर मुलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये रुची होती आणि त्याच जोरावर त्यांची निवड मध्य प्रदेश रणजी संघात देखील झाली होती. मात्र त्यांच्या क्रिकेट खेळण्यास आईचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी क्रिकेटचा विचार कायमचा सोडून दिला.

शॉटगन नेमबाजी मधील डबल ट्रॅप प्रकारात सहभागी होत असत. त्यांनी आशियाई क्ले टार्गेट स्पर्धेत २००३ ते २००६ अशी सलग चार वर्षे सलग सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले वैयक्तिक रौप्य पदक त्यांनी २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवून दिले. त्यांनी पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात हे पदक प्राप्त केले होते. त्यावेळी ते भारतीय सेनेत कर्नल या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात अतीविशिष्ट सेवा पदक मिळवणारे ते ब्रिगेडीअर हुद्द्याच्या खाली असणारे पहिलेच सेना अधिकारी होते.

काही काळानंतर त्यांनी भारतीय लष्करातून निवृत्त घेत भारताच्या राजकारणात उडी घेतली आणि २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून देखील आले. आपल्या खासदार पदाच्या सुरुवातीच्या कार्यकाळात त्यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री पदावर काम केले. त्यानंतर मात्र त्यांना क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, राज्यवर्धन सिंग राठोड यांना २००३-०४ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००४-०५ मध्ये राजीव गांधी खेलरत्न आणि २००५ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी
जळगाव
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.