खाद्यसंस्कृती; अख्खा मसूर

0

लोकशाही विशेष लेख

बरेचजण आज काय स्पेशल? असे सारखेच विचारु लागलेत. अहो रोज रोज थोडी स्पेशल बनवणारे आपण? एखादं वेळ ठिक आहे, सणवार आहेतच स्पेशल बनवण्यासाठी. रोज आपली पोळी, भाजी, आणि डाळ, भात हाच बेत!
आज बनवली जाणारी रेसिपी ही आपल्या रोजच्या मेन्यूमध्येसुद्धा समाविष्ट असून जी खुप प्रसिद्ध सुद्धा आहे आणि ढाब्यावर जाऊन खाणार्‍यांची गर्दी देखील भरपूर आहे, ती म्हणजे अख्खा मसूर…

साहित्य :

१ वाटी अख्खी मसूर डाळ, २/३ मोठे कांदे, २ टोमॅटो, ८/१० पाकळ्या लसूण, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, १ चमचा आलं -लसूण पेस्ट, जिरे, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर, अमूल फ्रेश क्रीम सजावटीकरिता
खडा मसाला : २ लवंग, २ वेलची, १ स्टार फूल, २ तमाल पत्र, १ दालचीनी, १/२ चमचा जीरे

कृती:

१) प्रथम २/३ तास अख्खा मसूर स्वच्छ धुवून भिजवून घ्या.
२) भिजवलेली मसुर ३ वाटी पाणी घालून कुकरमध्ये दोन ते तीन शिट्टीमध्ये शिजवून घ्या. (जास्त शिटी देवू नये, मसूर अख्खा राहणार नाही)
३) कढईत तेल गरम करून त्यात सर्व खडा मसाला व १ चमचा जीरे फोडणीला घालून परतवून घ्या.
४) आता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून विरघळेपर्यंत परतून घ्या. त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाका.
५) कांदा – टोमॅटो चांगले परतवून त्यामध्ये जीरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट मिरची पावडर, हळद, घालून चांगले परतवून घ्या.
६) आलं -लसूण पेस्ट घालून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतवून त्यामध्ये शिजवून घेतलेले अख्खा मसूर घालून परतवून घ्या.
७) २ वाटी पाणी घालून उकळी येऊ द्यावी. आता चवीनुसार मीठ घालून अख्खा मसूर शिजवून घ्यावे.
८) उकळी आल्यावर अख्खा मसूरमध्ये अमूल क्रिम आणि वरतून कोथिंबीर घालून रोटी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत देखील खायला छान लागते.
घरी ऐनवेळी एखादे पाहूणे आल्यानंतर जेवणाला काय करावे कळत नाही, अशावेळी आपण अख्खा मसूर करून पाहुण्यांना देखील खूश करू शकता.
(अख्खा मसूर झटपट करायचा असल्यास दोन शिटी जास्त द्यावी.)

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.