इंस्टाग्राम व्हिडीओ बनविण्याच्या नादात ४ मित्रांनी गमावला जीव

0

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल सोशल मिडियाचे क्रेझ वाढत जात असून, तरुणाई त्याला बळी पडत जात आहे. बऱ्याचदा फेमस होण्यासाठी तरुण आपल्या जीवाची पर्वा ना करता वाट्टेल ते करायला तयार असतात. आणि आपला जीव गमावून बसतात. तसाच एक धक्कादायक प्रकार राजस्थान (Rajasthan) मधल्या चुरु या जिल्यात घडला आहे. रविवारी डोहात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरूणांपैकी एका तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरूणांनी इंस्टाग्रामवर (Instagram) आपण पोहत असताना लाईव्ह व्हिडीओ टाकण्याच्या नादात प्राण गमावल्याचे म्हटले जात आहे. या चौघा तरूणांचे मृतदेह गावकऱ्यांनीच डोहातून तीन तासांच्या प्रयत्नांनंतर शोधून काढले.

इंस्टाग्राम वर चांगल्या व्हिडीओ मिळण्याच्या नादात सुरेश ( वय 21 ) आणखीन खोल पाण्यात उतरला. परंतू पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुरेश बुडू लागला. त्याला बुडताना पाहून त्याचे तीन सहकारी मित्र देखील खोल पाण्यात उतरले. परंतू सुरेशसह त्याचे तीन मित्रही गंटागळ्या खाऊ लागले. आणि चौघेही पाण्याच्या वर येऊच शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेत रामसरा निवासी सुरेश नायक ( वय 21), योगेश रैगर ( वय 18 ), लोकेश निमेल ( वय 18 ) आणि कबीर सिंह ( वय 18 ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.