वरणगाव विकास सोसायटी निवडणुकीत शेतकरी पॅनल विजयी

0

वरणगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव शहरातील विविध कार्यकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी पॅनल १३ पैकी १०जागेवर विजय मिळवत यश प्राप्त केले तर स्वच्छ पॅनला अवघ्या तीन जागेवर समाधान मानावे लागले.

शेतकऱ्यांच्या अर्थिक संकटात हातभार लावणारी विविध कार्यकारी सोसायटी च्या आज दिनांक १९ रविवार रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल व स्वच्छ सहकार पॅनल अशा दोन पॅनलचे एकूण तेरा सभासदांसाठी २६ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी दहा जागी शेतकरी विकास पॅनलचे बढे दिनेश सुरेश(१२१), चौधरी जितेंद्र कमलाकर(११९)जोशी विवेक नरहरी,(११९)वंजारी अनिल प्रभाकर(११३)चौधरी आशिष कुमार प्रभाकर (११२)देशमुख विलासराव अण्णाजी(११२)वंजारो अनिल शंकर(१११)महीला राखीव जागेवर झोपे ज्योती लक्ष्मण(१२४) माळी द्वारकाबाई कडू(११८) अनुसूचित जाती जमाती जागेवर इंगळे जनार्दन चावदस(११८) हे शेतकरी पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले तर स्वच्छ सहकार पॅनलचे भगाळे जितेंद्र सुधाकर(१०६) इतर मागासवर्गीय जागेवर झोपे विनोद गणेश(१२५)धनगर बाळकृष्ण पोपट(१३५)अशी उमेदवार विजयी झाले आहे एकूण मतदार१५१मतदारा पैकी १४१मतदारांनी हक्क बजावला तर त्यात १९मते अवैध ठरली .

या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल चे नेतृत्व केले तर स्वच्छ सहकार पॅनलचे नेतृत्व सुधाकर जावळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली

Leave A Reply

Your email address will not be published.