योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने सुपरस्टार रजनीकांत झाले ट्रोल

0

लखनऊ;- साऊथ आणि बॉलिवूड चे सुपरस्टार रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या ते पाया पडल्याने सोशल मीडियावर सुपरस्टार रजनीकांत ट्रोल झाले असून त्यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
सध्या ‘जेलर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

https://twitter.com/i/status/1692898110744535187

यादरम्यान थलायवा रजनीकांत यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून रजनीकांत यांना ट्रोल केलं जातंय. काही चाहत्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

रजनीकांत यांनी लखनऊमध्ये योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘वाया घालवलेली भेट.. रजनीकांत यांनी स्वत:चीच प्रतिमा खराब करून घेतली’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही तमिळनाडूसाठी लज्जास्पद बाब आहे. अध्यात्मचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वत:चाच सन्मान विसरून जाल’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली. तर ’72 वर्षीय रजनीकांत हे 51 वर्षीय योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श करत आहेत’, असंही काहींनी म्हटलं आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.